डोंबिवलीत गणपतीबाप्पाने बुजवले खड्डे
By Admin | Updated: August 23, 2016 15:34 IST2016-08-23T15:32:28+5:302016-08-23T15:34:24+5:30
डोंबिवलीकर सध्या खड्ड्यांनी त्रस्त झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात साक्षात गणपती बाप्पा खड्डे बुजवण्यासाठी आले होते.

डोंबिवलीत गणपतीबाप्पाने बुजवले खड्डे
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २३ - डोंबिवलीकर सध्या खड्ड्यांनी त्रस्त झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्डे बुजवा आंदाेलन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी साक्षात गणपती बाप्पा खड्डे बुजवण्यासाठी आले.
मनसेच्या वतीने झालेल्या आंदोलनात गणेशाचे बहुरुप घेऊन खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे हे आंदाेलन चर्चेचा विषय ठरले. कल्याण डाेंबिवली महापालिका खड्डे बुजवित नाही. साक्षात गणपतीला येऊन खड्डे बुजविण्याचे काम करावे लागत असल्याने ते प्रशासनाच्या दिरंगाईची खिल्ली उडविणारे ठरले.