शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राज्यातील अंध गायकांची 'डोळस' आषाढीवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:07 IST

कोरोना विषाणूमुळे प्रत्यक्ष जाता येत नसले तरी राज्यातील १० अंध गायकांनी अनोख्या पद्धतीने आषाढीवारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देराज्यातील अंध गायकांची 'डोळस' आषाढीवारीआळविली ऑनलाईन भक्तिगीते : घडविले विठ्ठलाचे सांगितिक दर्शन

संदीप आडनाईककोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे प्रत्यक्ष जाता येत नसले तरी राज्यातील १० अंध गायकांनी अनोख्या पद्धतीने आषाढीवारी सुरु केली आहे.प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाईंड या संस्थेच्या ह्यआषाढी वारी २०२०ह्ण या ऑनलाईन कार्यक्रमात भक्तिगीते आळवित कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यांतील १० निवडक अंध गायकांनी श्रोत्यांना वारीतील विठ्ठलाचे 'डोळस' सांगितिक दर्शन घडविले. आज, शनिवारपासून हा उपक्रम २ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन झूम अँपद्वारे आज, शनिवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्यासह अनेकजण उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमासाठी सुस्मिता कण्हेरी आणि ऋतुजा देसाई यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे, तर प्रेरणा असोसिएशनचे पदाधिकारी सुनील रांजणे, दिलावर शेख, पराग कुंकूलोक, हणमंत जोशी यांनी इतर जबाबदारी उचलली.संध्या सुळे यांनी देव माझा विठूसावळा, कोल्हापूरचा सिध्दराज पाटील याने अवघे गरजे पंढरपुर तर श्रध्दा घोंगडे हिने पांडूरंग कांती, संगिता पाटील हिने धरिला पंढरिचा चोर, सारिका शिंदे हिने भावभोळ्या भक्तीची, तेजल व्यास यांनी भेटीलागी जीवा, ब्रम्हदेव काटे याने किती तुझी वाट पाहू, सचिन पिसाळ याने इंद्रायणी काठी देवाची आळंदी, निकिता सोनकांबळे हिने सुंदर ते ध्यान, डाँ.दिव्या बिजुर यांनी खेळ मांडियेला ही गाणी गायिली. या सर्वांनी स्वत:च्या घरात या गीतांचे रेकॉर्डिंग केले.यूट्यूब आणि येरळावाणी रेडिओवर प्रसारणहा आषाढीवारी २0२0'' कार्यक्रम २७ जून ते २ जुलै या कालावधीत यूट्यूबवर सकाळी ११ वाजल्यापासून श्रोत्यांसाठी उपलब्ध झाले आहे. (https://youtu.be/8PejBvt8a1g ) तर या ऑनलाईन सांगीतिक उपक्रमाचे प्रसारण येरळा वाणी कम्युनिटी रेडिओवर (९१.२) त्यांच्या नियमित प्रसारणामध्ये सुरु आहे. सांगली, जत परिसरातील रेडिओच्या श्रोत्यांना याचा लाभ होणार आहे.

भक्ती हीच शक्ती हे सार्थ ठरवीत या आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाबरोबरच सकारात्मक संदेश देण्याचा आणि जीवनाकडे पाहण्याचा उन्नत दृष्टिकोनदेखील अनुभवण्यास मिळणार आहे.- सतीश नवले,सचिव, प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाईंड 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीkolhapurकोल्हापूरmusicसंगीत