कुत्र्यांनी घेतला बालकाचा बळी
By Admin | Updated: January 26, 2015 04:12 IST2015-01-26T04:12:16+5:302015-01-26T04:12:16+5:30
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे घडली़ महेश संतोष जाधव असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे़

कुत्र्यांनी घेतला बालकाचा बळी
तीर्थपुरी (जि. जालना) : भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे घडली़ महेश संतोष जाधव असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे़
जिल्हा परिषद शाळेत पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणारा महेश त्याचा मोठा भाऊ बाळूसमवेत सरपण आणण्यासाठी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या आवारातील विहिरीकडे गेला. त्या परिसरात मांस विक्रीची दुकाने असून मोकाट कुत्र्यांचा येथे सुळसुळाट असतो. त्यातील काही कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात महेशचा मृत्यू झाला. दरम्यान, बाळू घरी परतला, परंतु महेश न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता तो मृतावस्थेत आढळून आला. संतप्त ग्रामस्थांनी मांसविक्रीची दुकाने येथून हलविण्यासाठी रास्ता रोको केला. (वार्ताहर)