कुत्र्याने एकाच दिवशी ३८ जणांचा घेतला चावा
By Admin | Updated: July 12, 2015 02:39 IST2015-07-12T02:39:22+5:302015-07-12T02:39:22+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालीत तालुक्यातील टाकळी येथे शुक्रवारी रात्री अंगणात झोपलेल्या ३८ जणांना चावा घेऊन जखमी केले.

कुत्र्याने एकाच दिवशी ३८ जणांचा घेतला चावा
चाळीसगाव (जि. जळगाव) : पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालीत तालुक्यातील टाकळी येथे शुक्रवारी रात्री अंगणात झोपलेल्या ३८ जणांना चावा घेऊन जखमी केले.
जखमींमधील सकवारबाई पंडीतराव मगर (७२) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात आले. १६ जखमींना धुळे येथे तर उर्वरीत जणांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय व उंबरखेड तसेच शिसरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अंगणात झोपलेल्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. पहाटे चारपर्यंत या कुत्र्याने अक्षरश: धुडगूस घातला. (प्रतिनिधी)