शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:36 IST

याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

मुंबई - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या नाराज आहेत.  या बाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी कारणे दिली जात असून त्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. एवढच नाही तर त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना पंकजा भाजप सोडतील असं वाटत नाही. 

पंकजा मुंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडे सभागृहात नाही. मात्र विधान परिषदेत त्यांचा प्रवेश होऊ शकतो. त्याला भाजप किती अनुकूल आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यातच आपण 12 डिसेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान पंकजा भाजप सोडणार यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, पंकजा भाजपच्या चौकटीतून बाहेर जातील असं वाटत नाही. मात्र पक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा त्यांचा समज असावा. कदाचित राज्यातील नेतृत्वाविषयी त्यांची तक्रार असू शकते, असंही पवार यांनी नमूद केले.

याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.