कोणी घर देता का घर?

By Admin | Updated: August 1, 2016 02:20 IST2016-08-01T02:20:20+5:302016-08-01T02:20:20+5:30

शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली.

Does anyone give home? | कोणी घर देता का घर?

कोणी घर देता का घर?


मुंबई : शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली. मात्र यातील २ हजार प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना एमएमआरडीएने घरे दिलेली नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ््यात या कुटुंबियांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. शासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष दयावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ‘रहिवाशांनी दिला आहे.
मुंबई शहराच्या बाहेरुन येणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीत अडकून न पडता तत्काळ दक्षिण मुंबईत पोहचता यावे, यासाठी एमएमआरडीने ईस्टर्न फ्री वे हा मार्ग बांधला. या प्रकल्पात सात हजार झोपडीधारकांच्या झोपड्या येत होत्या. प्रकल्पग्रस्त सर्व झोपडयांचे एमएमआरडीए पुनर्वसन करेल, असे आश्वासन झोपडीधारकांना देण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पातील केवळ पाच हजार झोपड्यांचे पाजंरापोळ, मानखुर्द लल्लूभाई कंपाऊन्ड आणि गोवंडी परिसरात पुनर्वसन केले आहे. उर्वरित २ हजार झोपड्या या बोगद्याच्या वरच आहेत. या झोपडीधारकांचे देखील एमएमआरडीएने पुनवर्सन कारावे अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. तरीही या आमच्या समस्येकडे एमएमआरडीए दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
याबाबत काही दिवसांपूर्वी येथील पांजरापोळ एकता समितीचे अध्यक्ष लाजरस ठोंबे यांनी एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला. मात्र उर्वरित झोपड्या या प्रकल्पामध्ये बाधित नसल्याने त्यांचे पुनवर्सन होऊ शकत नाही, असे उत्तर त्यांना एमएमआरडीएने दिले आहे. याठिकाणी प्रकल्प सुरु असताना होणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे अनेक झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बोगद्यामुळे रहिवाशांना घरांचे बांधकाम देखील करता येत नाही. त्यामुळे या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत.
या रहिवाशांचे पुनवर्सन करण्याची जवाबदारी ही शासनाची आहे. त्यांनी या रहिवाशांचे डोंगराच्या खाली पुनवर्सन करावे त्यानंतर डोंगरावरील रिकाम्या जागेत गार्डन तयार करावे, असा प्रस्ताव या समितीने एमएमआरडीए समोर मांडला आहे. मात्र एमएमआरडीए अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने येत्या काही दिवसातच याठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Does anyone give home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.