लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर हल्ला

By Admin | Updated: April 6, 2015 03:32 IST2015-04-06T03:32:22+5:302015-04-06T03:32:22+5:30

लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या महिलेचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी दोन डॉक्टरांना

Doctors at Life Line Hospital attack | लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर हल्ला

लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर हल्ला

पनवेल : लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या महिलेचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी दोन डॉक्टरांना बेदम मारहाण केली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आक्रमक झाली आहे. सोमवारी सर्व ओपीडी बंद ठेवण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
रोडपाली येथील नामुबाई ठाकूर यांना लाइफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करतानाच त्यांची प्रकृती गंभीर असल्याची कल्पना नातेवाइकांना देण्यात आली होती. मुंबईला नेण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र याच ठिकाणी उपचार व्हावे असा आग्रह नातेवाइकांनी धरला. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाइकांनी डॉ. संदीप आमले व डॉ. अमित चव्हाण यांना मारहाण केली. त्यांना फॅ्रक्चर झाले आहे. कुटुंबीयांना मारण्याची धमकीही दिली असल्याची असोसिएशनची तक्रार आहे. असोसिशनने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले. डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केली आहे.

Web Title: Doctors at Life Line Hospital attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.