‘आयएम’ला स्फोटके पुरवणाऱ्या डॉक्टरच्या पाकवाऱ्या
By Admin | Updated: April 2, 2015 05:01 IST2015-04-02T05:01:02+5:302015-04-02T05:01:02+5:30
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला वेळोवेळी स्फोटके पुरविणाऱ्या डॉ. सय्यद इस्माईल लंका (३६) याने अटकेपूर्वी अनेकदा पाकिस्तान

‘आयएम’ला स्फोटके पुरवणाऱ्या डॉक्टरच्या पाकवाऱ्या
मुंबई : इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला वेळोवेळी स्फोटके पुरविणाऱ्या डॉ. सय्यद इस्माईल लंका (३६) याने अटकेपूर्वी अनेकदा पाकिस्तानवाऱ्या केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीतून समोर आली आहे. लंका आणि त्याचा साथीदार सद्दाम हुसेन खान (२८) सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत.
या दोघांनी पुरविलेल्या स्फोटकांच्या आधारे इंडियन मुजाहिद्दीनने मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात बॉम्बस्फोट घडविल्याचा दाट संशय एटीएसला आहे. मुंबईच्या १३/७ बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने या दोघांना अटक केली असून,
त्यांची सध्या कसून चौकशी सुरू
आहे.
डॉ. लंका याची पत्नी पाकिस्तानी आहे. याच नात्याआड डॉ. लंका अनेकदा पाकिस्तानात जाऊन आला. तसेच वरचेवर तो पाकिस्तानात फोनही करतो, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांना त्याच्या चौकशीतून समजली. यातील तथ्यता एटीएस पडताळून पाहणार आहे. तसेच पाकिस्तानवारीत तो कोणाला भेटला, फोनवरून तो कोणाशी संपर्कात असतो, याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)