डॉक्टरचा कन्येवर ६ वर्षे बलात्कार
By Admin | Updated: September 18, 2016 02:13 IST2016-09-18T02:13:28+5:302016-09-18T02:13:28+5:30
नालासोपाऱ्यात आयुर्वेदिक डॉक्टर असलेला बाप धमकावून आपल्या मुलीवर गेली सहा वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला

डॉक्टरचा कन्येवर ६ वर्षे बलात्कार
विरार : नालासोपाऱ्यात आयुर्वेदिक डॉक्टर असलेला बाप धमकावून आपल्या मुलीवर गेली सहा वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने अपत्याला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. आरोपी बापावर गुन्हा दाखल क़रण्यात आला आहे.
आरोपी ४८ वर्षांचा असून तो नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे राहतो. त्याच्या मुलीने अंधेरीतील नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा तुळींज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी २०११ पासून तिच्यावर धमकावून बलात्कार करत होता. तीन वेळा त्याने आयुर्वेदीक औषधे देऊन तिचा बेकायदेशीर गर्भपातही घडवून आणला होता. तिने अपत्याला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)