ठाण्यात विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक

By Admin | Updated: August 25, 2016 05:03 IST2016-08-25T05:03:40+5:302016-08-25T05:03:40+5:30

तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर अमेर पंजवानी (४४) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

The doctor was arrested in connection with the molestation case in Thane | ठाण्यात विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक

ठाण्यात विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक


ठाणे : तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर अमेर पंजवानी (४४) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या २४ तासांतच २० पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे. अल्पावधीत आरोपपत्र दाखल होण्याची दुसरी घटना आहे.
कल्याण येथील ३० वर्षीय महिला मुंबईच्या एका नामांकित कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. ती ठाण्यातील नौपाडा येथील डॉ. पंजवानी यांच्या स्पेक्ट्रम क्लिनिकमध्ये मंगळवारी गेली होती. डॉक्टरने तिच्याशी गैरवर्तन केले. प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार दोन ते तीन वेळा केल्याने तिने आरडाओरडा केला. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध रात्री ११च्या सुमारास गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पी.डी. लोंढे यांच्या पथकाने त्याला अवघ्या तासाभरातच अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The doctor was arrested in connection with the molestation case in Thane