शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 17:49 IST

एकाचवेळी अनेक रुग्णांवर उपचार सुरू असल्यानं डॉक्टरांना मंत्र्यांचा फोन घेता आला नाही

यवतमाळ: महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा फोन न घेतल्यानं एका कनिष्ठ निवासी डॉक्टरला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. सोमवारी (३ फेब्रुवारी) संध्याकाळी ५.३० वाजता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा प्रकार घडला.वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. तेवढ्यात राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट मंत्र्यांना फोन लावला. उपचारात व्यस्त असलेल्या डॉक्टरला ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो अथवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये’ असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर  कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट सहा महिने निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले. हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना केवळ फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का, असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीdoctorडॉक्टर