पुण्यात डॉक्टरांचा कडकडीत बंद
By Admin | Updated: March 19, 2017 00:32 IST2017-03-19T00:32:34+5:302017-03-19T00:32:34+5:30
धुळे येथील निवासी डॉक्टरला मारहाण केलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे (आयएमए) तर्फे शनिवारी जिल्हाधिकारी
पुण्यात डॉक्टरांचा कडकडीत बंद
पुणे : धुळे येथील निवासी डॉक्टरला मारहाण केलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे (आयएमए) तर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेंन्सी डॉक्टर, पुणे (मार्ड) व हॉस्पिटल असोसिएशनसह एकूण ३० संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोर्चासाठी शहरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) घेतला होता. मात्र, हॉस्पिटलमधील तातडीच्या वैद्यकीय सेवा सुरू ठेवल्याने रुग्णांची गैरसोय काही अंशी टळली. (प्रतिनिधी)