सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या

By Admin | Updated: December 20, 2015 14:37 IST2015-12-20T14:31:48+5:302015-12-20T14:37:31+5:30

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर रविवारी वृद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने हादरले.

Doctor killed in Sangli; | सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या

सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या

ऑनलाइन लोकमत 

इस्लामपूर, दि. २० - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर रविवारी वृद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने हादरले.  मारेक-यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने डॉ. प्रकाश कुलकर्णी (६५) आणि डॉ. अरुणा कुलकर्णी या दाम्पत्याची हत्या केली. दोघांची धारदार शस्त्रांनी वार करुन  हत्या करण्यात आली. 

डॉ. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुममध्ये तर, डॉ. अरुणा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. दोघेही इस्लामपूरमधील नावाजलेले डॉक्टर होते. डॉ. प्रकाश कुलकर्णी फिजिशिअन तर, डॉ. अरुणा स्त्रीरोग तज्ञ होत्या. 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. मारेक-यांना पकडण्यासाठी संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या उद्देशाने झाली ते पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

Web Title: Doctor killed in Sangli;