शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:53 IST

Thane Docter News: शिवनेरी रुग्णालयातील डॉ. प्रभू आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याने एकच खळबळ माजली.

उल्हासनगर: शिवनेरी रुग्णालयातील डॉ. प्रभू आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून मृत्यू प्रमाणपत्र दिल्याच्या घटनेची गंभीर दखल महापालिका आरोग्य विभागाने घेतली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी रुग्णालयाला नोटीस पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाईचे संकेत डॉ. धर्मा यांनी दिले. उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात राहणारे अभिमान तायडे यांच्यावर यापूर्वी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना १५ दिवसांपूर्वी घरी आणले होते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांची तब्येत बिघडल्याने नातेवाइकांनी त्यांना शिवनेरी रुग्णालयात नेले. बेशुद्धावस्थेत असलेल्या तायडे यांची रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आहुजा यांनी रिक्षातच तपासणी करून मृत घोषित केले. तसेच मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तायडे यांना घरी आणले. त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची तयारी सुरू असताना तायडे यांनी हालचाल केल्याने त्यांना उपचारासाठी त्वरित क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांची तब्येत ठणठणीत होऊन त्यांनी जेवण घेतले.

उत्तराकडे लागले लक्षशिवनेरी रुग्णालयाच्या डॉ. आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभिमान तायडे यांच्या नातेवाइकांना अभिमान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याकरिता दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. त्यानंतर तायडे यांच्या नातलगांनी आधार कार्ड आणून मृत्यू दाखला मागितला. त्यांच्यावर विश्वास ठेवून दाखला दिल्याचे डॉ. प्रभू यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा यांनी पाठविलेल्या नोटिशीला डॉ. आहुजा काय उत्तर देतात व त्यांचा दावा पालिका स्वीकारते का, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे