डॉक्टरचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

By Admin | Updated: August 19, 2015 01:16 IST2015-08-19T01:16:26+5:302015-08-19T01:16:26+5:30

पत्नीचे परिसरातील इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरनेच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री चेंबूर येथे घडली

A doctor attacked his wife | डॉक्टरचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

डॉक्टरचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

मुंबई : पत्नीचे परिसरातील इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरनेच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री चेंबूर येथे घडली. यामध्ये पत्नीसह मुलगादेखील जखमी झाला असून, दोघांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवेंद्र सोनावणे (३७) असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, तो चेंबूरच्या खारदेव नगर येथे कुटुंबासह राहतो. या परिसरात त्याचा होमिओपॅथी दवाखाना आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीचे परिसरातील एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे नेहमीच तो पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो दवाखान्यातून घरी आल्यानंतर कुटुंब गाढ झोपेत असताना त्याने पुन्हा पत्नीला मारहाणीस सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने घरातील कोयता घेऊन पत्नीच्या डोक्यावर दोन वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून मुलगा आईला वाचवण्यासाठी धावून आला. आरोपीने त्याच्या हातावरदेखील एक वार केला आहे.
त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी मुलाला आणि पत्नीला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल
केले.
गोवंडी पोलिसांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A doctor attacked his wife