नाही फिकीर ना काळजी

By Admin | Updated: August 2, 2016 01:18 IST2016-08-02T01:18:30+5:302016-08-02T01:18:30+5:30

पावसाळा व त्यातच खड्ड्याच्या संख्येत झालेली वाढ व मनपा कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यामुळे नागरिक मात्र हैराण आहेत.

Do not worry, do not worry | नाही फिकीर ना काळजी

नाही फिकीर ना काळजी


धनकवडी : सध्या सुरू असलेला पावसाळा व त्यातच खड्ड्याच्या संख्येत झालेली वाढ व मनपा कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यामुळे नागरिक मात्र हैराण आहेत. पावसाने निर्माण झालेले खड्डे बुजवण्याचे सध्या तरी काम सुरू आहे. मात्र मानवनिर्मित खड्डे करण्याचे काम सध्या तरी सुरू असून, याकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष असल्याने नागरिकमात्र त्रस्त आहेत.
कात्रज दत्तनगर येथील पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या कात्रज मार्गावर मागील आठ ते दहा दिवसांपासून गटारवाहिनी ब्लॉक झाल्याने दुर्गंधीयुक्त गटार रस्त्यावरून उघड्यावर वाहत होते. त्याचा ब्लॉक काढण्यासाठी म्हणून व चेंबर शोधण्यासाठी म्हणून मागील आठवड्यात भर रस्त्यावर खोदाई करण्यात आली. मात्र, या खोदाईमुळे अनेक जणांचा अपघात होत आहे. राडारोडा असाच रस्त्यावर टाकल्याने चिखलाचे सामाज्य पसरलेले आहे.
व्यावसायिकांना नोटीस
या ठिकाणी खोदाई केल्यावर व चेंबर सापडल्यावरदेखील धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या ड्रेनेज विभागाकडून तुंबलेल्या गटारवाहिनीचे काम केलेच नाही. याउलट हा रस्ता मुख्य खात्याचा असल्याने मुख्य खात्याला कळविल्याचे सांगितले. या ठिकाणी खोदलेला खड्डा मनपाने खोदलेलाच नसल्याचेही प्रभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जे अनधिकृत छोटे व्यावसायिक आहेत, त्यांना नोटीस
देण्यात आल्याचे सांगितले. मात्र यावर क्षेत्रीय अधिकारी मीटिंगमध्ये असल्याने व फोनवरून उत्तर न मिळाल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Do not worry, do not worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.