स्वत:साठी नको, पक्षासाठी काम करा

By Admin | Updated: February 19, 2015 01:14 IST2015-02-19T01:14:32+5:302015-02-19T01:14:32+5:30

नगरसेवक म्हणून काम करताना केवळ स्वत:चा विचार न करता पक्षासाठी काम करून पक्षसंघटन मजबूत करावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.

Do not work for yourself, work for the party | स्वत:साठी नको, पक्षासाठी काम करा

स्वत:साठी नको, पक्षासाठी काम करा

पुणे : नगरसेवक म्हणून काम करताना केवळ स्वत:चा विचार न करता पक्षासाठी काम करून पक्षसंघटन मजबूत करावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. ठाकरे यांनी मुंबईत कल्याण डोंबविली, मुंबई आणि पुणे महापालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली.
या वेळी पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्कही वाढविण्याच्या सूचना या बैठकीत नगरसेवकांना देण्यात आल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसल्याने पक्षसंघटन येत्या दोन वर्षांत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सावरण्यासाठी मनसेकडून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पुण्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ठाकरे यांनी मंगळवारी पुणे, मुंबई तसेच कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली. (प्रतिनिधी)

पक्षाला फटका
४पक्षाच्या नगरसेवकांकडून गट अध्यक्ष नेमताना केवळ मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नेमणुका केल्या जातात. त्यामुळे पक्षसंघटन मर्यादित राहून इतर कार्यकर्ते नाराज होतात. याचा फटका पक्षाला बसून पक्ष नगरसेवकांपुरताच मर्यादित राहतो. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी तंबी या वेळी नगरसेवकांना देण्यात आली. तसेच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क करण्यासाठी येत्या काही दिवसांत विधानसभानिहाय मेळावे घेण्यात येणार असल्याचेही पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Do not work for yourself, work for the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.