बंदुका नको, नांगर हाती घ्या!

By Admin | Updated: October 11, 2014 06:04 IST2014-10-11T06:04:47+5:302014-10-11T06:04:47+5:30

हिंसेचा मार्ग सोडा, खांद्यावरून बंदुका उतरवा आणि त्या खांद्यावर नांगर घ्या. बंदुक पृथ्वीला रक्तरंजित बनविते.

Do not want guns, take plow! | बंदुका नको, नांगर हाती घ्या!

बंदुका नको, नांगर हाती घ्या!

चंद्रपूर/अमरावती/हिंगोली : हिंसेचा मार्ग सोडा, खांद्यावरून बंदुका उतरवा आणि त्या खांद्यावर नांगर घ्या. बंदुक पृथ्वीला रक्तरंजित बनविते. नांगर मात्र या धरतीला हिरवे करते. हिंसेतून समाधान कदापिही मिळणे शक्य नसल्याने हा मार्ग सोडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये केले़ तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चंद्रपूर, अमरावती आणि हिंगोली जिल्ह्णात मोदी यांच्या जाहीरसभा झाल्या़ मोदी म्हणाले, सीमाप्रांतात वास्तव्यास असलेल्या आणि पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या कुटुंबांना केंद्र शासनाकडून पुरेपूर मोबदला दिला जाईल, असे सांगून मोदी म्हणाले, एकहाती सत्ता दिल्यास महाराष्ट्रात नवे उद्योग, व्यवसाय उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले तर मातीतून सोने पिकवता येईल, असे मोदी म्हणाले़

Web Title: Do not want guns, take plow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.