सांस्कृतिक क्षेत्रातील दडपशाही सहन करणार नाही - जयंत सावरकर
By Admin | Updated: January 25, 2017 17:23 IST2017-01-25T17:23:52+5:302017-01-25T17:23:52+5:30
राम गणेश गडकरी पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहणारी दडपशाही कलाकार व प्रेक्षक सहन करणार नाहीत असा रोखठोक जबाब

सांस्कृतिक क्षेत्रातील दडपशाही सहन करणार नाही - जयंत सावरकर
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 25 - राम गणेश गडकरी पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहणारी दडपशाही कलाकार व प्रेक्षक सहन करणार नाहीत असा रोखठोक जबाब उस्मानाबाद येथील नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी कल्याणमध्ये दिला.
सीकेपी संस्था कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातर्फे भाषाप्रभु राम गणेश गडकरी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीसोहळा कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत सावरकर यांनी सांस्कृतिक चळवळीत येऊ पाहणाऱ्या दहशतवादा बद्दल आपले मन मोकळे केले. समारोहास कायस्थ प्रबोधनच्या संपादिका नीता प्रधान, उद्योजक समीर गुप्ते, संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रसंघटक दिपक सोनाळकर, परिवहन सदस्य राजू दिक्षीत तसेच सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाल दुर्वे, शास्त्रज्ञ अजित महाडकर, प्रशांत मुल्हेरकर, अशोक कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर आदी उपस्थित होते.