शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'या' गोष्टी फेसबुकवर शेअर करू नका!...

By admin | Updated: January 31, 2017 17:04 IST

फेसबुकवर माहिती शेअर करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवर खालील काही गोष्टी शेअर करू नका...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - सोशल नेटवर्कसाठी जगप्रसिद्ध असलेलं फेसबुक सध्या बहुतांश लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. फेसबुकवरून आपल्याला लोकांशी कनेक्ट होता येत असले तरी हे कनेक्शन तुम्हाला महागात पडू शकते. होय, सायबर क्राईमचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेता फेसबुकवर माहिती शेअर करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवर खालील काही गोष्टी शेअर करू नका... फोन नंबर : प्रत्येकजण हा काहींना काही कामामुळे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर आपला मोबाईल नंबर शेअर करत असतो. पण तुमच्या या मोबाईल नंबरचा देखील गैरवापर होऊ शकतो.डेट ऑफ बर्थ : तुमच्या जन्मदिनी तुम्हाला तुमच्या मित्रांनी विष करावं म्हणून सोशल मीडियावर तुमची जन्मतारीख महत्वाची असते. पण हीच जन्मतारीख तुमच्या फेसबुकवर उपलब्ध असेल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो : सोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो असणे तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकतं. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर असतील तर आजच काढून टाका.लोकेशन : प्रवास करताना उत्साहाने आपण आपली लोकेशन शेअर करतो. परंतु आपली लोकेशन पाहून आपल्या घरी कोणी नसल्याचे संकेत नकळपणे आपण इतरांना देत असतो. याचा गैरफायदा घेणाऱ्यांमुळे तुमच्या घराची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.बॉस : तुमचा बॉस तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणं तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतं. अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत ज्यामुळे फेसबूक यूजर्सला त्यांचं मत शेअर केल्यानंतर जॉब गमवावा लागला आहे. त्यामुळे बॉसला फ्रेंडलिस्ट मध्ये ठेऊ नका.

रिलेशनशिप स्टेटस - जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसालही फेसबुक रिलेशनशिप स्टेटस कधीही शेअर करु नका. कोणीही तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकतो. तुम्ही कधी सिंगल आहात कधी रिलेशनशिपमध्ये आहात यामुळे तुमच्यासाठी ती अडचण निर्माण होउ शकते.