बाळासाहेबांच्या नावाखाली गैरकारभार दडवू नका -राज ठाकरे

By Admin | Updated: February 15, 2017 22:06 IST2017-02-15T22:06:52+5:302017-02-15T22:06:52+5:30

बाळासाहेबांचे फोटोही जाहिरातीत वापरले जात आहेत. पण बाळासाहेबांचे नाव घेऊन तुमचा गैरकारभार लपवू नका, असा टोला राज ठाकरे यांनी आज शिवसेनेला लगावला

Do not repudiate wrongdoing in Balasaheb's name - Raj Thackeray | बाळासाहेबांच्या नावाखाली गैरकारभार दडवू नका -राज ठाकरे

बाळासाहेबांच्या नावाखाली गैरकारभार दडवू नका -राज ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
दिवा, दि. 15 - शिवसेनेच्या होर्डिंगवर करून दाखवलंची जाहिरात केली जात आहे. पण काही करण्याआधी कुणी असं कुणी सांगतं का? बाळासाहेबांचे फोटोही जाहिरातीत वापरले जात आहेत. पण बाळासाहेबांचे नाव घेऊन तुमचा गैरकारभार लपवू नका, असा टोला राज ठाकरे यांनी आज शिवसेनेला लगावला. 
दिव्यात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पण मतदारांच्या हाती काय लागते आहे घंटा असा सवाल त्यांनी केला. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर परप्रांतियांचे लोंढे येत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांनाही त्यांचा पुळका आला आहे. भाजपाचा तर परप्रांतियांच्या मतावर डोळा आहे. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.  दिवावासीय डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येने त्रस्त आहेत. पण मी नाशिकमध्ये डम्पिंग ग्राऊंडचे काय केले आहे ते बघा. तेथे कचऱ्यापासून खत तयार केले जात आहे, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला. 

Web Title: Do not repudiate wrongdoing in Balasaheb's name - Raj Thackeray