डेंग्यू नियंत्रणाकडे दुर्लक्ष नको
By Admin | Updated: September 18, 2014 00:46 IST2014-09-18T00:46:45+5:302014-09-18T00:46:45+5:30
सध्या साथ रोगांचा काळ सुरू आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी शुक्र वारी

डेंग्यू नियंत्रणाकडे दुर्लक्ष नको
जिल्हा परिषद : उपाध्यक्षांचा बैठकीत इशारा
नागपूर : सध्या साथ रोगांचा काळ सुरू आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी शुक्र वारी आरोग्य समितीच्या बैठकीत दिला. सदस्य जयकुमार वर्मा, माया कुसुंबे, संध्या गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात डेंग्यूचे पाच रूग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करा, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व साथरोग नियंत्रण अधिकाऱ्यांना दिल्या. साथरोगाच्या कालावधीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोक नियंत्रण कार्यक्र मांतर्गत २६,७९२ रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यात ४३ जणांचे नमुने दूषित आढळले. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत १२,५५७ रक्त नमुने तपासण्यात आले. यात ५८ जणांना हत्ती रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. हत्तीरोग नियंत्रणासाठी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या. तसेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी घरोघरी संपर्क साधण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात नेत्र शस्त्रकि या व तपासणीचे ३४००० उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु त्यानुसार मेयो व मेडिकल रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नसल्यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)