माझ्या मुलीला सुरक्षा देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: November 11, 2014 11:51 IST2014-11-11T08:50:45+5:302014-11-11T11:51:40+5:30
आपल्या मुलीला सुरक्षा देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला पत्र लिहून कळवले आहे.

माझ्या मुलीला सुरक्षा देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली झेड प्लस सुरक्षा हटवून वाय सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच आपली मुलगी दिवीजा हिलाही सुरक्षा देण्याची गरज नाही, असेही त्यांनी गृह विभागास पत्र लिहून स्पष्ट केले आहे.
सध्या गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून त्यांच्या या मागणीवर विचार करून मंत्रालयतर्फे उत्तर देण्यात येईल. एका सामान्य माणसाप्रमाणे प्रवास करणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जाण्यासाठी विशेष सरकारी विमानाचा वापर करण्यासही नकार दिला होता.
दरम्यान मुख्यमंत्र्याना कोणती सुरक्षा पुरवावी याचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.