शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका  : 'पीएमआरडीए'ची सर्व बॅँकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:22 IST

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. याला लगाम घालणे आवश्यक बनले आहे.

पुणे : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना बॅँकांकडून अर्थसाह्य होत असल्याने अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना ‘पीएमआरडीए’ने शहर व जिल्ह्यातील सर्व बॅँकांना दिल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील सर्वच अनधिकृत बांधकामांबाबत सर्व बॅँकांना कळवले आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. याला लगाम घालणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने पावले उचलली आहेत. पीएमआरडीएने याचाच एक भाग म्हणून बॅँकांसोबत मंगळवारी बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद पाठक, जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापकांसह राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँकांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते. बांधकाम नकाशावर ग्रामपंचायतींचे शिक्के मारून संबंधित बांधकामाला मंजुरी असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना बांधकाम मंजुरीचे अधिकार नाहीत. त्यामुळे बांधकामांना ग्रामपंचायतींची परवानगी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणुकीचे होत आहे. जिल्ह्यातील १४०९ पैकी ८४२ ग्रामपंचायतींचा पीएमआरडीएमध्ये समावेश होतो. या कार्यक्षेत्रात गावठाणाबाहेरील सर्व क्षेत्र हे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहे. ग्रामपंचायत गावठाणाबाहेरील क्षेत्रांमध्ये बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार पीएमआरडीएला आहेत. कोणत्याही बांधकामास ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. पण, तसे दाखवून व्यवहार केला जातो. यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते. ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी दाखवून बॅँकाही अशा बांधकामांना सहजपणे कर्ज देतात. ......ग्रामपंचायतीने मंजूर केले तरी कर्ज देऊ नका...मंजुरी देताना बॅँकांनी संबंधित बांधकामाला पीएमआरडीएची मंजुरी आहे का, हे तपासून घ्यावे. बांधकाम नकाशाची प्रत तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करावी. बांधकामाला पीएमआरडीएची मान्यता असेल तरच कर्ज मंजूर करावे, अशी सूचना बॅँकांना दिलेली आहे. गावठाण हद्दीबाहेरील बांधकामांच्या नकाशावर ग्रामपंचायतीचे मंजुरीचे शिक्के असतील, तर अशा बांधकामांना कर्ज देऊ नये, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचनाही अधिकाºयांनी दिल्या आहेत. कर्ज मंजूर करताना कोणती कागदपत्रे मागावीत, कोणती आवश्यक आहेत, याचे नियम आहेत. याचे पालन बॅँकांनी करावे, असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएbankबँक