शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:19 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

औरंगाबाद, दि. 19 : पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायकवाडी प्रशासनास मंगळवारी दिवसभर लोकांनी फोन करून याबाबत विचारणा केली. त्यामुळे धरण प्रशासनाने सायंंकाळी अधिकृत प्रेसनोट काढून पाणी सोडले नसल्याचा खुलासा केला आहे.या बाबत धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारी प्रकल्पाचे एक ही गेट उघडले नाही. ह्यजायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडलेह्ण अशी बातमी सोशल मीडियावरून पसरविली जात आहे ती पूर्णपणे खोटी आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये.धरणामध्ये मंगळवारी ६७.५३ टीएमसी म्हणजे ८८.१० टक्के जलसाठा असून आवाक ४३०० क्युसेक होती. नाशिककडून येणाºया पाण्याची आवाक मंदावली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाणी सोडल्याच्या अफवांमुळे गोदाकाठच्या अनेक गावांत एकच गोंधळ उडाला. पूराच्या भीतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची मागच्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :Damधरण