युतीला ताकद देणे अंगलट

By Admin | Updated: May 22, 2014 05:14 IST2014-05-22T05:14:06+5:302014-05-22T05:14:06+5:30

राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही

Do not give strength to the alliance | युतीला ताकद देणे अंगलट

युतीला ताकद देणे अंगलट

यवतमाळ : राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही. त्यांच्या या जिल्'ात राज्यातील सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपुरातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे हे कॅबिनेट मंत्री पराभूत झाले. पूत्र प्रेमापोटी भाजपा-शिवसेनेला ताकद देण्याची खेळी काँग्रेसवरच उलटली.सहा वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळूनही माणिकरावांना आपल्या गृहजिल्'ासह राज्यात पक्षाची ताकद वाढविता आलेली नाही. यवतमाळ जिल्'ातील दिग्रस या आपल्या परंपरागत म्हणविणार्‍या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तब्बल २७ हजार मतांची आघाडी मिळाली. यवतमाळ जिल्'ात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या जिल्'ाचे आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना येथे काँग्रेस उमेदवारांना मतांची आघाडी मिळवून देता आलेली नाही. यवतमाळ-वाशिममधून मोघे तर चंद्रपुरातून देवतळे अनुक्रमे ९३ हजार व दोन लाख ३६ हजार मतांनी पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकरावांनी यवतमाळ जिल्'ात स्थानिक व सोईच्या राजकारणापोटी विरोधी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आपला परंपरागत विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी रिकामा व्हावा म्हणून शिवसेनेतच लोकसभेचा दुसरा उमेदवार पुढे करण्याची खेळीही पडद्यामागून माणिकरावांनीच खेळली होती. मात्र ‘मातोश्री’वरून प्रतिसाद न मिळाल्याने ही खेळी फसली. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन बंडखोर सभापतींना तर यवतमाळ नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या बंडखोर नगराध्यक्षाला ताकद देण्याची खेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी खेळली. मात्र या खेळीचे मास्टर मार्इंड माणिकराव ठाकरेच होते. नेमकी हीच खेळी काँग्रेसच्या अंगलट आली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Do not give strength to the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.