शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 03:01 IST

एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे.

मुंबई - एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. तसेच उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास किंवा तक्रार करायची असल्यास सबळ पुराव्याच्या आधारे ते १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करू शकतात, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या चार वर्षांमध्ये एसटी महामंडळामार्फत पारदर्शक पद्धतीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष, स्वत: प्रत्येक भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही पदाच्या भरती प्रक्रियेत अध्यक्षासहित कोणाचाही वशिला चालणार नाही. तसेच इतर प्रलोभने अथवा कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.२४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८ हजार २२ चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरू असून, यापैकी पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा आणि संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुण तालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तथापि कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना काही लोकांकडून नियमबाह्यरीत्या काम करून अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचे आमिष संबंधित एजंटकडून दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून काही उमेदवारांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सध्या सुरूअसलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत असून कोणताही वशिला अथवा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केले जाणार नाही, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :state transportएसटीjobनोकरी