नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका, संजय निरुपमांना पोलिसांचा इशारा

By Admin | Updated: December 24, 2016 13:06 IST2016-12-24T13:02:42+5:302016-12-24T13:06:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे

Do not fall out of the house till Narendra Modi in Mumbai, police warns Sanjay Nirupam | नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका, संजय निरुपमांना पोलिसांचा इशारा

नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका, संजय निरुपमांना पोलिसांचा इशारा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. संजय निरुपम यांना बेवर्ली हाईट्स या घरातच स्थानबद्ध करण्यात आलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका, असा इशाराच पोलिसांनी दिलेला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुणे दौ-यावर असून शिवस्मारक आणि पुणे मेट्रोचं भूमिपूजन करणार आहेत. यानिमित्त संजय निरुपम यांनी नोटाबंदीविरोधात मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं. वांद्रे कुर्ला संकुलात हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने मोर्च्याला परवानगी नाकारत संजय निरुपम यांना स्थानबद्द केलं आहे.
 
संजय निरुपम यांनी घरामध्ये एक व्हिडीओ शूट करुन शेअर केला आहे. ज्यामध्ये ते ही हिटलरशाही असल्याचं बोलले आहेत. तसंच निवडणूक जवळ येत असल्यानेच मोदी येत असल्याचा आरोप केला आहे. मला घराबाहेर पडू द्यावं, मोदींना तास आदेश लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
 

Web Title: Do not fall out of the house till Narendra Modi in Mumbai, police warns Sanjay Nirupam