कर्तृत्ववानांना एका समाजात अडकवू नये
By Admin | Updated: August 3, 2014 00:41 IST2014-08-03T00:41:53+5:302014-08-03T00:41:53+5:30
विचारांची व्यापकता केवळ सर्व घटकांना सांगितली पाहिज़े आपण त्यांना एका समाज घटकापुरते ठेवणो चूक आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल़े

कर्तृत्ववानांना एका समाजात अडकवू नये
पुणो : संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम करणा:या कर्तृत्ववान व्यक्ती समाजात होऊन गेल्या आहेत़ त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे अशा अनेक विभूती होऊन गेल्या आहेत़ त्यांच्या विचारांची व्यापकता केवळ सर्व घटकांना सांगितली पाहिज़े आपण त्यांना एका समाज घटकापुरते ठेवणो चूक आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल़े
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आल़े या वेळी ते बोलत होत़े या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार गिरीश बापट, रमेश बागवे, बापूसाहेब पठारे, दीप्ती चवधरी, जयदेव गायकवाड, अनंतराव गाडगीळ, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, सुशीला नेटके, अंकुश काकडे, फुले यांच्या वंशज नीता होले उपस्थित होत़े
पवार म्हणाले, की महात्मा फुले हे सामान्य कुटुंबातील घटक; पण त्यांचा विचार हा उद्याचा होता़ शेतकरी, दलित, स्त्रीशिक्षणाबरोबरच आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्याकडे होता़ सामाजिक नेते असले तरी, शेतीतील जाणकार तसेच व्यावसायिक दृष्टिकोन होता़ त्यातूनच त्यांनी त्या काळात बांधकाम कंपनी स्थापन करून आपल्यातील उद्योजक दृष्टी कृतीतून दाखवून दिली होती़ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे यांची जयंती सर्व समाज घटकाकडून का साजरी केली जात नाही, असा मला प्रश्न पडतो़
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ज्या कालखंडात हे काम केले त्याला तोड नाही़ महिलांची तेव्हाची परिस्थिती पाहता हे धाडसच म्हणावे लागेल़ सनदशीर मार्गाने केलेले बंड, समाजसुधारकांच्या कामाने अनेक आमूलाग्र बदल घडल़े महिलांचे नेतृत्व पुढे यायला लागले आह़े सावित्रीबाईंच्या स्वप्नातील हे काम आह़े (प्रतिनिधी)
4महात्मा फुले समता स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारकादरम्यान काही घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आह़े याशिवाय या दोन्ही स्मारकाला जोडणा:या रस्त्यांचे काम बाकी आह़े त्यासाठी लागणा:या खर्चासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात केली़ त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी या कामासाठी राज्य शासन 5 कोटी रुपये देईल, अशी घोषणा केली़
महात्मा फुले यांचे सहकार्य असताना आणि ते हयात नसतानाही सावित्रीबाईंनी स्वत: पुढाकार घेऊन सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेल़े
- छगन भुजबळ,
सार्वजनिक बांधकाम मंत्री.