शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

मुंबईत रेल्वे प्रवास करणा-या महिलांच्या डब्याला सर्वसाधारण करू नका ; गृह विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 6:42 PM

मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत.

नागपूर : मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. जुईनगर येथे लोकलच्या महिला डब्यात पोलिस जवान नसल्याने महिलेला चोरटयाने लुटून लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडली असतांनाही आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी अशा प्रकारे निर्णय घेऊन महिलाबददलची अनास्था दाखवून दिल्याची भावना व्यक्त होत आहे. यावर शासन स्तरावरून सदर कार्यवाहीयाबाबत योग्य ती सकारात्मक कृती होण्याच्या दृष्टीने तशा सूचना आरपीएफच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांना तातडीने द्याव्यात, ही आपणास विनंती करित आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी महिलांची गैरसोय होणे टाळता येईल असे निवेदन आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाला दिले आहे.

त्या आपल्या निवेदनात म्हणतात, ‘राज्य शासन महिलांवरिल होणारे अत्याचार ,हल्ले,रोखण्याकरिता शासन कायदा विविध उपाययोजना आखत आहे. महिलांचा सन्मान व्हावा यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.असे असतांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे असतांनाही उलटपक्षी महिलांकरिता आरक्षित असलेला डबा पोलिसांची संख्या कमी असल्याने रदद करण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बलाने मांडला आहे.  मुंबई शहरामध्ये  रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलांवरील अत्याचार,हल्ल्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन सर्व स्तरावरुन झालेल्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी लोकलसाठी प्रत्येक लोकलमध्ये जीआरपी पोलिस उपलब्ध करून दिले होते. असे असताना मध्य रेल्वेच्या आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून सायं ७ ते रात्री ११ या काळात लोकलमधील महिलांच्या चार डब्यांपैकी एक डबा सुरक्षेसाठी पोलिस जवान नसल्याने कमी करण्याची शिफारस केलेली आहे यावर गृह विभागाने सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी आ. डॉ. गोऱ्हे यांच्या मागणीवरून गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय, मुंबई येथे रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत आपल्या उपस्थितीत एक विशेष बैठकदेखील घेतली होती. या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपनगरीय रेल्वे मध्ये आवश्यक प्रमाणात पोलीस कर्मचारी असावेत यासाठी सखोल चर्चा होऊन याबाबत अवाश्यक उपाय योजना करण्याचे या अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेMumbai Localमुंबई लोकल