डंपरची पनवेल-ठाणे लोकलला धडक, हार्बर रेल्वे विस्कळीत
By Admin | Updated: June 16, 2016 14:15 IST2016-06-16T14:01:49+5:302016-06-16T14:15:21+5:30
हार्बर रेल्वे मार्गावर एक डंपर पनवेल-ठाणे लोकल ट्रेनला धडकला आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.

डंपरची पनवेल-ठाणे लोकलला धडक, हार्बर रेल्वे विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १६ - हार्बर रेल्वे मार्गावर एक डंपर पनवेल-ठाणे लोकल ट्रेनला धडकला आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. दुपारी एकवाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरचालक डंपर तिथेच सोडून पसार झाला.
या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी रेल्वे पोलिस दाखल झाले असून, डंपरला तिथून हटवण्याचे काम सुरु आहे. डंपर हटवल्याशिवाय रेल्वे वाहतूक पूर्ववत होऊ शकणार नाही.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही धडक जोरदार होती.
यामध्ये ट्रेनच्या काही भागाचे आणि डंपरचेही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.