द.मा. मिरासदार यांचा सन्मान

By Admin | Updated: July 3, 2015 03:05 IST2015-07-03T03:05:03+5:302015-07-03T03:05:03+5:30

ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार हे यंदाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो,

D.M. The honor of Mirasdar | द.मा. मिरासदार यांचा सन्मान

द.मा. मिरासदार यांचा सन्मान

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार हे यंदाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, यंदा पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. शिवाजीराव भोसले यांच्या जन्मदिनी १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एस.एम. जोशी फाउंडेशन येथे होणाऱ्या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते मिरासदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Web Title: D.M. The honor of Mirasdar