लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.
By Admin | Updated: February 7, 2017 05:01 IST2017-02-07T05:01:13+5:302017-02-07T05:01:27+5:30
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.

लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.
नाशिक : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.
मुंबईत राज्यपालांच्या हस्ते एका विशेष समारंभात लवकरच त्यांना पदवीप्रदान करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवारी सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. विद्यापीठाने २०११ मध्ये आशा भोसले यांना डी.लिट पदवी देऊन गौरव केला आहे. विद्यापीठाने यापूर्वी वि. वा. शिरवाडकर, शांताबाई दाणी, बाबा आढाव यांना डी.लिट उपाधीने सन्मानित केले आहे. (प्रतिनिधी)