डीकेटीई - झेक विद्यापीठाचा संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प

By Admin | Updated: November 16, 2014 23:44 IST2014-11-16T23:43:22+5:302014-11-16T23:44:58+5:30

देशभरातील नामवंत संशोधक व वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

DKTE - Czech University joint research project | डीकेटीई - झेक विद्यापीठाचा संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प

डीकेटीई - झेक विद्यापीठाचा संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प

इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्था आणि झेक रिपब्लिकचे लिब्रेस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधनात्मक प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही संस्थांच्यावतीने येथील डीकेटीईमध्ये ‘इनोव्हेटिव्ह टेक्स्टाईल मटेरियल अ‍ॅण्ड स्ट्रक्चरस’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात लिब्रेस विद्यापीठाचे तज्ज्ञ, तसेच देशभरातील नामवंत संशोधक व वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. लिब्रेस विद्यापीठ व डीकेटीई यांच्यात तांत्रिक ज्ञान देवाण-घेवाणाचा करार झाला. या करारांतर्गत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला प्रा. जिरी मिलित्की, प्रा. राजेश मिश्रा, प्रा. बी. के. बेहरा यांनी शोधनिबंध सादर केले.
लिब्रेस विद्यापीठाच्या तज्ज्ञ मंडळींनी डीकेटीई सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉनओव्हनला भेट दिली. भविष्यामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल्स व विशेषत: नॉनओव्हनमध्ये डीकेटीई, सीओई व लिब्रेस विद्यापीठ यामध्ये संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे.

इचलकरंजी येथील डीकेटीई संस्था व झेक येथील लिब्रेस विद्यापीठाच्यावतीने आयोजित परिसंवादामध्ये दीपप्रज्वलित करताना प्रा. बी. के. बेहरा. यावेळी राजेश मिश्रा, डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. जिरी मिलित्की, डॉ. यु. जे. पाटील उपस्थित होते.

Web Title: DKTE - Czech University joint research project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.