शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

डीएसके प्रकरण : बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिका-यांना मिळणार क्लीन चीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:02 IST

अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या तीन अधिका-यांना क्लिनचीट देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत

पुणे : अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या तीन अधिका-यांना क्लिनचीट देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येणार असून याबाबतचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) आज (शनिवार) विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.  

       बँकेचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक वेदप्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत तसेच विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना आर्थिक गुन्हे शाखेने जूनमध्ये अटक केली होती.  मराठे, गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांना अटक झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता मराठे, गुप्ता, देशपांडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. मुहनोत यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली. 

             बँक कर्मचा-यांनी अधिकाराचा गैरवापर करून डीएसके यांना ड्रीमसिटी प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. सर्व बँकांची संमती नसतानाही ठराव पारित करून मूळ कर्ज मंजुरीच्या ठरावात बदल करून ५० कोटी रुपये कर्जाच्या नावाखाली देण्याचा निर्णय घेतला. संबंधित निधी प्रकल्पावर खर्च झाला की नाही, हे देखील आरोपींनी पाहिले नाही. कर्ज वितरणाबाबतचे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे (आरबीआय) सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. बँक आॅफ महाराष्ट्राच्या बाजीराव रस्त्यावरील शाखेत डिएसकेंचे तब्बल १ हजार २२० धनादेश वटले नव्हते. याचा विचार कर्ज प्रकरण माघारी बोलावण्यासाठी केला नाही. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने डिएसके यांच्या कर्जाचे पुर्नगठण करणे आवश्यक होते. मात्र, गुप्ता आणि मराठे यांनी त्यांना १० कोटी रुपयांचे कर्ज डिएसकेडीएल कंपनीला १२ एप्रिल २०१७ रोजी मंजूर केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. 

      या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या सरकारी लेखापालांनी हा प्रकार उघड केला होता. त्यानंतर बँके चे चार अधिकारी आणि डीएसके यांचे चाटर्ड अकाऊंटंट (सीए) सुनील मधुकर घाटपांडे, डीएसके ग्रुपचे मुख्य अभियंता राजीव दुल्लभदास नेवासकर यांना अटक करण्यात आली होते. बँकेच्या सर्व उच्च स्तरीय अधिका-यांना अटक केल्याने बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. अधिका-यांवर केलेली कारवाई त्वरीत मागे घ्यावी, यासाठी बँकेच्या कर्मचा-यांनी आंदोलन देखील केले होते.   

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी