शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शेतक-यांना दिवाळी भेट! कर्जमाफीची रक्कम उद्या खात्यात , मुख्यमंत्र्यांची घोषणा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 04:35 IST

शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी जमा होणार आहे.

जालना/सोलापूर : शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी जमा होणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने महिनाभरात सर्वच पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जालना येथे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफी योजनेचा फायदा घेण्यासाठी आॅनलाइन भरलेल्या अर्जाचे लेखापरीक्षण करून, ते बँकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोडकेले आहे. पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे शासनाच्या आय. टी. विभागाने तपासणी करून त्याची वर्गवारी केली आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशा वर्गवारी केलेल्या शेतकºयांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र राहाणार आहे. या याद्या जिल्हास्तरावर बँका व तालुकास्तरीय समितीला मंगळवारी मिळणार असून, याच आधारे सन्मानासाठी शेतकºयांची नावे निश्चित केली जाणार आहेत.शेतक-यांचा सत्कारबुधवारी मुंबईत राज्यभरातील निवडक शेतक-यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कर्ज माफ झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशी वर्गवारी केलेल्या शेतक-यांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार