शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिवनेरी अपघातातील मृतांना एसटीकडून 10 लाख रुपये- दिवाकर रावते 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 9:49 PM

पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून २ जण मृत्युमुखी पडले आहेत.

मुंबई - पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून 2 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी झाले, यापैकी मृत पादचाऱ्यांच्या वारसांना एसटीकडून प्रत्येकी 10 लाख रुपये तर जखमींना एसटीच्या प्रचलित नियमानुसार रुग्णालयाचा उपचाराचा सर्व खर्च एसटीमार्फत केला जाणार असल्याची घोषणा मा. परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली असून, संबंधित चालकालासह या बसच्या दुरुस्तीचे काम करणारे दोन सहाय्यक(मॅकेनिक) यांना प्राथमिक अहवालानुसार कामात हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. तसेच झालेल्या अपघाताची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणा-या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात करण्यात आली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भातील सादरीकरण करून योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करून देणा-या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही प्रारंभ झाला.‘स्लीपर शिवशाही’ व ‘लालपरी’चे लाँचिंगशयनयान (स्लीपर कोच) शिवशाही बसचे अनावरण करण्यात आले. त्साध्या बसचे ‘लालपरी’ हे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचेही अनावरण देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवतींना एसटी चालक पदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याच्या योजनेचाही प्रारंभ झाला. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागातील योजनांचा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलग्रस्त तरु णांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना महत्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटीची स्थानके तसेच एसटी बसेस आता बदलत आहेत.आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरुण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नींसाठी सुरू केलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत.नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळ योगदान देईल, असे रावते यांनी सांगितले. एसटी महामंडळातील अधिकाºयांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रु पयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. अरविंद सावंत, अनिल देसाई, आ. वारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते