शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील दिव्यांग धीरजने सर केले किलीमांजरो हिमशिखर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:35 IST

प्रजासत्ताकदिनी फडकविला तिरंगा; ‘लोकमत’चा फलकही झळकविला!

- विजय शिंदे अकोट (जि. अकोला) : अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच असे किलीमांजरो हे हिमशिखर प्रजासत्ताकदिनी सर केले. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडसाच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करीत धीरजने भारताचा तिरंगा ध्वज प्रजासत्ताकदिनी पहाटे दिमाखाने फडकविला. त्यासोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचा भगवा ध्वज आणि दैनिक ‘लोकमत’चा फलकही झळकविला. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला भारतीय दिव्यांग आहे.आफ्रिका खंडातील किलीमांजरो हा सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील ईशान्य भागातील केनियाच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची १९ हजार ३४१ फूट म्हणजेच ५ हजार ८९५ मीटर आहे. विशेष म्हणजे, हा जगातील सर्वात उंच पर्वत असून, बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमस्खलन होत असते. हा पर्वत सरळ उभा असल्याने वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे यश मिळविले. धीरज हा मुंबई येथून आपल्या चमूसह २१ जानेवारीला टान्झानियाला रवाना झाला. तेथे सर्व तयारी करून साहित्यासह बेस कॅम्प पार करीत २३ जानेवारीला चढाईला सुरुवात केली. पहाटे शिखरावर पोहोचल्यानंतर धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी- जय भवानीचा जयघोष केला. सर्वांनी राष्ट्रगीत गायले. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. धीरजसोबत सर्वाधिक कमी वयाचा पिंपरी चिंचवडचा साई कवडे (९ वर्षे), मुंबईच्या प्रियंका गाडे, नवी मुंबई पोलीस दलातील साताराचे मूळ रहिवासी तुषार पवार यांनीही मोहीम यशस्वी पूर्ण केली. मोहिमेसाठी ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी मार्गदर्शन केले.‘लोकमत’ने दिला मदतीचा हात!आर्थिक परिस्थितीने हतबल असलेल्या धीरजची साहस कथा व किलीमंजारो पर्वत सर करण्याची त्याची अपेक्षा ‘लोकमत’ने मदतीचा हात सदरात प्रकाशित केली. त्यानंतर अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांकडून त्याला मदतीचा ओघ सुरू झाला.माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द : धीरजची आर्थिक स्थिती हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील मजुरी करतात. पैशांअभावी २०१५ मध्ये त्याच्या बहिणीचे शिक्षण थांबले. धीरजने मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द तो मनाशी बाळगून आहे. 

टॅग्स :Akolaअकोला