शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा होर्डिंग प्रकरणी 4 नगरसेवकांवर गुन्हा दाखल केल्यानं पालिका अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:16 IST

विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांचं निलंबन

नाशिक: बेकायदा होर्डिंग लावल्याने चार नगरसेवकांवर थेट गुन्हा दाखल करणाऱ्या महानगरपालिकेतील विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई आज महासभेत करण्यात आली आहे.ईदच्या दिवशी भाजप नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांच्या नावाने होर्डिंग्ज लावले होते. त्यावर धारणकर यांनी चारही नगरसेवकांवर गुन्हा दाखल केले होते. शहरात अनेक होर्डिंग्ज बेकायदा लावले जात असताना केवळ याच नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली. त्यातही संबंधित नगरसेवक हे नाशकात नव्हते. त्यातील एका नगरसेविकाच्या आईचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही याच नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हणत महापौरांनी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.धारणकरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात गोंधळ घातला. लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर महापौरांनी धारणकरांच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर महापौरांनी धारणकरांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करायचीच नाही का, लोकप्रतिनिधींना कायदा लागू होत नाही का, असे प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा