विभागनिहाय एटीएस पथक
By Admin | Updated: December 17, 2014 23:47 IST2014-12-17T23:47:27+5:302014-12-17T23:47:27+5:30
कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला

विभागनिहाय एटीएस पथक
कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. ही बाब चिंतेची असून राज्यातील एटीएस काय करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय एटीएस पथक हवे, अशी सूचना शिवसेनेचे अनिल परब यांनी केली. त्यावर निवेदन करताना रणजित पाटील यांनी याबाबत सरकार विचार करीत असल्याचे सांगितले. नागरिकांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी एक हेल्पलाईन सुरू करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण येथील प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. राज्याचे एटीएस पथक त्यांना मदत करीत आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीवर एटीएसचे लक्ष आहे. त्यांचे संशयास्पद अड्डे आढळल्यास ते उद््ध्वस्त करू, असे रणजित पाटील म्हणाले. प्रधान समितीच्या अहवालातील शिफारशींवरील अंमलबजावणीची माहिती पटलावर ठेवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. भाई गिरकर, शोभा फडणवीस जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग यांनीही चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)