शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 15:24 IST

राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे..

ठळक मुद्देपरीक्षा दिलेल्या एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : कुणी दृष्टीहीन तर कुणी कर्णबधिर, काहींना मानसिक आजार, बहुविकलांगता, अध्ययन अक्षमता, मज्जातंतुचा आजार.... अशा जवळपास २२ विविध आजारांचा सामना करत असताना खचून न जाता राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३ टक्क्यांनी अधिक आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांची एकुण २२ गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये अंशत: किंवा पुर्ण अंध, कर्णबधिर, भाषा व वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्यक्षन अक्षमता, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्टरोग निवारित, शारीरिक वाढ खुंटणे, बौध्दिक अक्षम, स्नायुची विकृती आदींचा समावेश आहे. त्यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अस्थिव्यंग असलेल्या सर्वाधिक १५८१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच दृष्टीहीन व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही एक हजारांहून अधिक होती. मज्जासंस्थेशी संबंधित आजार, वाढ खुंटलेले, भाषा व वाचा दोष, थॅलेसेमिया व अ‍ॅसिड हल्ला  झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या गटातील ९१ विद्यार्थी आहेत.नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हाजर १३१ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे. एकुण २२ पैकी केवळ सिकलसेल गटात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक होती. यामध्ये ३५ मुले व ४४ मुलींनी परीक्षा दिली होती. एकुण २२ पैकी ९ गटातील सर्व मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.------------------दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल -विद्यार्थी    परीक्षेला बसलेले        उत्तीर्ण       टक्केवारीदृष्टीहीन       ११५२                      १०९९           ९५.४०कर्णबधिर     १०६२                       ९५३             ८९.७४अस्थिव्यंग   १५८१                      १४७३           ९३.१७अध्ययन अक्षम १०७७                १०२९           ९५.५४वाढ खुंटलेले   २३                           २३            १००थॅलेसेमिया         १४                     १४             १००अ‍ॅसिड हल्ला    २                          २              १००मज्जातंतुचा आजार ३२              ३२            १००भाषा व वाचा दोष २१                  २१            १००इतर                  १३९२              १३०१          ९३.४६--------------------------------------------------एकुण             ६३५६               ५९४७              ९३.५७

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयResult Dayपरिणाम दिवस