नर्तकीवर पैशांची उधळण

By Admin | Updated: January 28, 2015 04:50 IST2015-01-28T04:50:55+5:302015-01-28T04:50:55+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला कर्मचा-यांच्या ‘विलासी प्रतापाने’ गालबोट लागले.

Diversion of money | नर्तकीवर पैशांची उधळण

नर्तकीवर पैशांची उधळण

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला कर्मचाऱ्यांच्या ‘विलासी प्रतापाने’ गालबोट लागले. सोमवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी करणाऱ्या नर्तकीला दाद देताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर चक्क पैशांची उधळण केली.
हे दृष्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरले असून दारूच्या नशेतील हा ‘प्रताप’चर्चेचा विषय ठरला आहे. केडीएमसी मुख्यालयासह डोंबिवली विभागीय कार्यालयात दरवर्षी माघी गणेशोत्सव उत्साहात होतो. सोमवारी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात सादर झालेल्या लावणी नृत्यात दारूच्या नशेतील काही कर्मचाऱ्यांनी नर्तकीवर पैशांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हे कर्मचारी इतके बेभान होते की त्यांचे हे विलासी कृत्य मोबाईलच्या कॅमेरात कैद होत असल्याचे त्यांना भानही नव्हते. (प्रतिनिधी)

Web Title: Diversion of money