शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

दिवेआगर सुर्वण गणेश दरोडा आणि दूहेरी खून : पाच जणांना आजन्म जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:53 IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप

जयंत धुळप

अलिबाग :दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप, तीन महिला आराेपींना १० वर्ष सक्तमजूरी ,दाेघांना ९ वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा साेमवारी संध्याकाळी निकाल देताना सुनावली आहे. दरम्यान दाेघा आराेपींना दाेषमुक्त करण्यात आले आहे.

मृत्यूपर्यंत जन्मठेप  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा झालेल्या पाच जणांमध्ये  नवनाथ विक्रम भोसले(32,रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (29, रा.घोसपुरी, अहमदनगर),छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (25, बिलोणी,औरंगाबाद),विजय उर्फ विज्या बिज्या काळे (28,श्रीगोंदा,अहमदनगर),  ज्ञानेश्वर विक्र म भोसले (34,घोसपुरी,अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिता सरकार पक्षाकडून हा खटला चालवणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. दरम्यान १० वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा झालेल्या तिन महिलांमध्ये खैराबाई विक्र म भोसले (56,घोसपूरी,अहमदनगर),  कविता उर्फ कणी राजू काळे (44,हिरडगाव,श्रीगोंदा,अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार(56,श्रीगोंदा,अहमदनगर) यांचा समावेश आहे. दराेड्यात चाेरुन आणलेल्या सुवर्ण गणेशाचे साेने घेणारे आनंद अनिल रायमोकर (38,बेलंवडी,श्रीगोंदा,अहमदनगर) व  अजित अरु ण डहाळे (28,श्रीगोंदा,अहमदनगर) या दाेघा साेनारांना ९ वर्ष सक्तमजूरी  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सूनावली असल्याचे अॅड.पाटील यांनी पूढे सांगीतले. 

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :RaigadरायगडCrimeगुन्हाCourtन्यायालय