बिबट्या पडला विहिरीत, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
By Admin | Updated: October 30, 2016 14:37 IST2016-10-30T14:36:05+5:302016-10-30T14:37:51+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज पहाटे घडली.

बिबट्या पडला विहिरीत, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, दि. 30 - तालुक्यातील रामगड गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज पहाटे घडली. या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे.
रामगड गावालगत दत्तू उखा चौधरी यांचे शेत आहे. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्या या शेतातील विहिरीत पडला. पांडुरंग उखा पाटील यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून असून, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी जळगाव येथूनही पथक येत असल्याचे सांगण्यात आले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.