शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रुग्ण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांना मिळणार अधिक लस, कोरोनाचा प्रसार रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 01:32 IST

राज्यात औरंगाबाद, अकोला, नंदुरबार, नाशिक, पुणे, बुलडाणा, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. औरंगाबादमध्ये ते २४.४ टक्के असून, रुग्णवाढीची अत्यंत धोकादायक स्थिती उद्भवली आहे.

मुंबई: राज्यात ज्या जिल्ह्यात काेराेना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, तेथे लक्ष केंद्रित करण्याची सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर अशा जिल्ह्यांत कंटेन्मेंट झोन्सची सक्ती आणि मुख्यतः लसीचा अधिकचा साठा द्यावा असेही आदेश दिले. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेला वेग येऊन संसर्ग नियंत्रणासाठी जाेमाने प्रयत्न करता येतील. (Districts with more patients will get more vaccines, instructions to focus on preventing the spread of corona)

राज्यात औरंगाबाद, अकोला, नंदुरबार, नाशिक, पुणे, बुलडाणा, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. औरंगाबादमध्ये ते २४.४ टक्के असून, रुग्णवाढीची अत्यंत धोकादायक स्थिती उद्भवली आहे, तर अकोला, नंदुरबारमध्ये ते अनुक्रमे २२.६ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, या महिनाअखेरपर्यंत काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांपर्यंत पोहोचेल.

याविषयी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांत कठोर निर्बंध लावणे गरजेचे आहे. सध्या राज्याचे पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण १०.९ टक्के आहे. राज्याच्या पॉझिटिव्हिटी प्रमाणाच्या तुलनेत राज्यातील १६ जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक आहे. काही जिल्ह्यांत मृत्युदरही अधिक असून, त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातील गर्दीवर निर्बंध लावणे गरजेचे आहे. सांगली, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा या जिल्ह्यांत मृत्यूचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेण्यावर भर देणे, चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्यातील मृत्यूचे प्रमाण डिसेंबर महिन्यात २.१९ टक्के होते. फेब्रुवारीत ते ०.८३ टक्क्यांवर आल्याचे दिलासादायक चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई