देशाच्या पटलावर ‘पालघर’ बनणार हटके जिल्हा
By Admin | Updated: August 2, 2014 23:00 IST2014-08-02T23:00:16+5:302014-08-02T23:00:16+5:30
अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे.

देशाच्या पटलावर ‘पालघर’ बनणार हटके जिल्हा
आशिष पाटील - केळवे-माहीम
अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे. या पटलावरील त्याचे स्थान ‘सबसे हटके’ रहाणार हे निश्चित आहे.
आजपासून राज्याच्या नकाशात पालघर या नवीन जिल्हय़ाचा आलेख चढणार आहे. देशात, राज्यात अनेक जिल्हे आहेत, मात्र या जिल्हय़ाची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती तसेच बलस्थाने पहाता देशातील वेगळा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला नक्कीच महत्त्व मिळेल. पश्चिमेला अरबी समुद्राचे लांब विस्तृत किनारे, त्यावर चालणारा मासेमारी व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, पूर्वेला सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा, त्यावर वसलेली घनदाट जंगले, दक्षिणोला वैतरणा, भाईंदरसारख्या खाडय़ा तर उत्तरेला गुजरातला चिरणा:या डहाणू, झाईसारख्या खाडय़ा अशी निसर्गाची देणगी घेऊन आलेला हा जिल्हा ज्याचा भूगोल पहाता कोणीही मोहीत होऊन जाईल.
या जिल्हय़ात विपुल पाण्याचे स्त्रोत, सुजलाम सुफलाम वसुंधरा, विविधतेने नटलेली वनराई, विविध पिकांची, विविध फळाफुलांची देण लाभलेली आहे. जवळच्या शहरी संस्कृतीची दरुगधी आहे, परंतु ग्रामीण संस्कृतीचा ओलावाही या जिल्ह्याने जपला आहे. ज्या ठिकाणी राम - लक्ष्मणाच्या काळातील देवस्थाने, रामकुंडे अजूनही जपून आहेत, तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे बुरुज, बाणकोट किल्लेही जपून आहेत, तसेच लाल फिरंग्याच्या अन्यायाविरोधात बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मारकेही येथे जतन केली जात आहेत.
विकासासाठी मागे वळून पहाण्याची अजिबात भीती नाही. फक्त दु:ख एवढेच की वाडा, विक्रमगड, जव्हारसारखी आजची आदिवासी भावंडे दु:खी आहेत. परंतू ‘सब्र का फल मिठा होता है’. त्याचाही कायापालट होणार आहे. कारण आमचा पालघर जिल्हा ‘सबसे हटके’ बनणार आहे.
पर्यटनात नेहमीच आघाडीवर
4देशातील प्रगतीचा इतिहास घडविणारा डॉ. होमी भाभा यांच्या आजोळातील पहिला तारापूर अणुशक्ती प्रकल्प असो किंवा आशियातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ही याच जिल्हय़ात आहे. सूर्यासारखे मोठे जलस्त्रोत या ठिकाणी आहेत. निसर्ग कवीच्या दृष्टीतील कॅलिफोर्निया किंवा पर्यटकांच्या मनातील केरळचे स्वपA केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील केळवा-माहीमच्या नारळी पोकळीच्या बागामध्ये विस्तृत समुद्र किना:यावर साकारता येते. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक विस्तृत पश्चिम रेल्वे राष्ट्रीय महामार्ग 8 याच जिल्हय़ातून जातो, तर विकासाची गंगा जेथे ओथंबून वाहते असे मुंबई, गुजरातसारखे दोन भाऊ शेजारीच आशेने उभे आहेत.