पाणी वाटपावरुन धुमश्चक्री

By Admin | Updated: June 13, 2016 23:15 IST2016-06-13T23:09:45+5:302016-06-13T23:15:01+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील पाणी वाटपावरुन सेना कार्यकर्ते आणि उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांच्यामध्ये रविवारी रात्री धुमश्चक्री झाली़

Dissolve the water allocation | पाणी वाटपावरुन धुमश्चक्री

पाणी वाटपावरुन धुमश्चक्री

मध्यस्थीनंतर वादावर पडदा : सेना कार्यकर्ते व उपनराध्यक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील पाणी वाटपावरुन सेना कार्यकर्ते आणि उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांच्यामध्ये रविवारी रात्री धुमश्चक्री झाली़
सेना कार्यकर्ते व उपनगराध्यक्ष शेख यांच्यामधील वाद पोलिसांपर्यंत गेल्यानंतर नगराध्यक्षा सुनीता शिंदे, तहसीलदार वंदना खरमाळे, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी सोमवारी बैठक घेऊन वादावर पडदा टाकला़
या बैठकीस सेनेचे नेते घनश्याम शेलार, उपनगराध्यक्ष अख्तार शेख, प्रा़ तुकाराम दरेकर, मनोहर पोटे, बापूसाहेब सिदनकर, पोपटराव खेतमाळीस, सुनील वाळके, सतीश पोखर्णा, सतीश मखरे, एम़ डी़ शिंदे , राजू गोरे आदी उपस्थित होते.
अख्तार शेख यांचे कार्यकर्ते होळी गल्लीत पाणी वाटप करीत असताना हा प्रकार घडला़ हा वाद पालिका निवडणुकीपासून सुरू होता़ आता पाणी प्रश्नाचे निमित्त झाले असले तरी या वादाला राजकारण व व्यक्तिगत हेव्यादाव्याची झालर आहे़ बैठकीस संतोष बोळगे व संतोष इथापे गैरहजर असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dissolve the water allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.