शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:47 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात असंतोष होता. राष्ट्रवादीत केवळ नियुक्त्या होत होत्या, मात्र निवडणूक कधी झाली असे वाटले नाही. षण्मुखानंद हॉल येथे २१ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षात अस्वस्थता होती.

मुंबई -  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात असंतोष होता. राष्ट्रवादीत केवळ नियुक्त्या होत होत्या, मात्र निवडणूक कधी झाली असे वाटले नाही. षण्मुखानंद हॉल येथे २१ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षात अस्वस्थता होती. या बैठकीनंतर सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी सोमवारी झालेल्या  सुनावणीत केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. यात अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. त्यांना अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय, पक्षाअंतर्गत निवडणुका, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद आदींबाबत शरद पवार गटाचे वकील शरण जगतियानी यांनी प्रश्न विचारले.    एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांची सही २०१९च्या निवडणुकीच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती हे अनिल पाटील यांनी मान्य केले. 

...म्हणून केले तसे विधान आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता तर मग पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये किंवा राजीनामा देऊ नये असे मत माध्यमात आपल्याकडून का व्यक्त करण्यात आले, असा सवाल वकिलांनी अनिल पाटील यांना केला. तेव्हा पार्टी एकसंघ राहिली पाहिजे यासाठी राज्यातील नेत्यांच्यासोबत आम्ही सातत्याने चर्चा करायचो. असंतोष कमी होण्याच्या दृष्टीने, लोकांमध्ये पक्षाची इमेज खराब नको व्हायला म्हणून असे विधान केले होते, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.  

२०१८ साली निवड नाही तर घोषणाशरद पवार यांनी राजीनामा देऊ नये म्हणून आपण दिलेले पत्र मीडियावर व्हायरल झाले होते, असा सवाल केला असता आपल्याला आठवत नसल्याचे अनिल पाटील म्हणाले. २१ जून रोजी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या बाजूने केलेले भाषणही आपल्याला आठवत नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे १९९९ पासून राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र २०१८ साली राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाली, पण निवडणूक झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार