पांचोली कुुटुंबाची राबिया खानविरुद्ध अवमान याचिका
By Admin | Updated: December 24, 2016 04:18 IST2016-12-24T04:18:44+5:302016-12-24T04:18:44+5:30
सूरज पांचोली व त्याच्या कुटुंबियावर कोणतेही बदनामीकारक व्यक्तव्य करणार नाही, असे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही

पांचोली कुुटुंबाची राबिया खानविरुद्ध अवमान याचिका
मुंबई : सूरज पांचोली व त्याच्या कुटुंबियावर कोणतेही बदनामीकारक व्यक्तव्य करणार नाही, असे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही राबिया खान सूरज व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक वक्तव्य करत असल्याने पांचोली कुुटुंबियांनी त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. तसेच बदनामी केल्याबाबत १०० कोटी रुपयांचा दावाही त्यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने राबिया खान यांना सूरज पांचोली व पांचोली कुटुंबियांविरुद्ध प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर बदनामीकारक व्यक्तव्ये न करण्याचे निर्देश दिले होते. तसे आश्वासनही राबिया यांनी उच्च न्यायालयाला दिले आहे. तरीही राबिया खान ट्विटरवर बदनामीकारक मजकुर टाकून सूरज व पांचोली कुुटुंबाची बदनामी करत असल्याचे आदित्य पांचोली व झरीना वहाब यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. राबिया खान यांच्या ट्विटर्सचे ३५०० फॉलोअर्स आहेत.
वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून राबिया आम्हाला व सूरजला शिवीगाळ करत आहे, असेही आदित्य व झरीना यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. याच आधारावर या दोघांनी यापूर्वीही राबियाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)