सर्व गृहनिर्माण मंडळांचे सभापती बरखास्त

By Admin | Updated: December 12, 2014 02:03 IST2014-12-12T02:03:59+5:302014-12-12T02:03:59+5:30

राज्यातल्या सहा गृहनिर्माण मंडळांचे सभापती बरखास्त करण्याचा निर्णय आज गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी घेतला.

Dismissers of all housing societies dismissed | सर्व गृहनिर्माण मंडळांचे सभापती बरखास्त

सर्व गृहनिर्माण मंडळांचे सभापती बरखास्त

अतुल कुलकर्णी ल्ल नागपूर
नागपूर : राज्यातल्या सहा गृहनिर्माण मंडळांचे सभापती बरखास्त करण्याचा निर्णय आज गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी घेतला. या सगळ्या मंडळांवर काँग्रेस, राष्ट्रवादीने आपल्या पदाधिका:यांची वर्णी लावली होती. याआधीच सिडकोवर नेमण्यात आलेले प्रमोद हिंदुराव यांना दूर करण्यात आले होते.
या आदेशामुळे नागपूर गृहनिर्माण मंडळावरील नाना पंचबुध्दे, मुंबई इमारत दुरुस्ती व पूर्नरचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड, नाशिक गृहनिर्माण मंडळाचे नरेंद्र दराडे, पुण्याचे अंकूश काकडे, कोकणचे माणिक जगताप आणि मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती युसूफ अब्राहानी यांचा यात समावेश आहे. या सर्व सभापतींच्या नियुक्त्या गुरुवारपासून रद्द झाल्या आहेत. याशिवाय मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ आणि कोकण गृहनिर्माण मंडळावरील प्रत्येकी तीन अशासकीय सदस्य आणि म्हाडावर असणारे दोन अशासकीय सदस्य यांच्याही नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. या मंडळांवर आता भाजपा आपल्या पदाधिका:यांच्या नेमणुका करणार आहे. मात्र यातील काही मंडळे, विशेषत: मुंबईतल्या मंडळांवर नेमणुका व्हाव्या म्हणून शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: Dismissers of all housing societies dismissed